तुम्ही एखाद्याला ३२ दात असल्याचे ऐकलं असेलच. मात्र एखाद्याला ५२६ दात असल्याची तुम्ही कल्पना तरी केली आहे का ? नाही ना…या घटनेत मात्र एका मुलाला ५२६ दात असल्याची घटना समोर आली. नुकतीच या मुलावर शस्त्रक्रिया करून त्याची या दातांपासून सुटका केली आहे.
चेन्नईमध्ये राहणाऱ्या सात वर्षीय रवींद्रनाथ या चिमुरड्याला जवळ जवळ ५२६ दात होते. वयाच्या तीन वर्षांपर्यंत या मुलाला कुठलाही त्रास जाणवतं नव्हता. परंतु, अचानक काही वर्षांनी त्यांच्या उजव्या गालाला सुज यायला लागली. त्यासाठी अनेक डॉक्टरांकडून उपचार घेतले पण काहीच फरक पडला नाही. अखेरीस दंत चिकित्सकांकडून चाचणी केली असता मुलाच्या लहान जबड्यात ५२६ दात असल्याचे निदान झाले.
नातेवाईकांच्या परवानगीनुसार डॉक्टरांनी तातडीनं ही शस्त्रक्रिया करत हे दात काढण्याचा निर्णय घेतला. चेन्नईतील एका डेंटल कॉलेजमध्ये डॉक्टरांनी जवळ जवळ पाच तास त्याच्यावर शस्त्रक्रिया करून हे दात बाहेत काढले. दरम्यान हि शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून चिमुरड्याची त्रासातून सुटका केली आहे.