माकड मानवी वस्तीतला आला म्हणजे तो हैदोस घालेले हे समजून जा. मात्र जर माकड रेल्वे स्थानकात पोहोचला तर प्रवाशांची ताराबळ उडेल. अशाच घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून सध्या कमेंटचा पाऊस पाडतंय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही हसन आवरू शकत नाही.
व्हिडीओत सध्या वसईच्या बस स्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरात एका माकडाचा वावर पाहायला मिळत आहे. कधी बस स्थानक परिसरात तर कधी रेल्वेस्टेशन परिसरात हे माकड फिरताना पाहायला मिळत आहे. गेल्या साधारण महिन्या भरापासून हे माकड या स्टेशन परिसरात ठाणमांडुन आहे. हे माकड लोकांनी दिलेली खाद्य पदार्थ मजेशीर पणे मटकवताना दिसत आहे.
दरोरजच्या प्रवाशांसाठी हे माकड आता चांगलेच परिचयाचे झाले आहे. त्यामुळे लोक दररोज त्याला वेगवेगळे खाद्य पदार्थ खायला टाकतात. हे माकड कधी रस्त्याच्यामध्ये तर कधी लोकांमध्ये जाऊन बसते. सहसा हे माकड कोणालाही त्रास देत नाही. मात्र कोण त्याच्या वाट्याला गेले तर त्याला सोडत नाही आहे तो.त्याचा जीव घेईपर्यंत पाठलाग करतोय. त्यामुळे इतर प्रवाशांसाठी हा प्रसंग खूप मजेशीर ठरतोय. दरम्यान हा स्टेशन परिसर आता या माकडाचा इलाका बनला असून वसई स्थानकात आता माकड राज्य आहे असे म्हंटले तर वावगे नक्कीच ठरणार नाही.