भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनीच्या चाहत्यांमध्ये आणखीन एका चाहत्याची भर पडली आहे. या चाहत्याचे नाव एकूण तुम्ही अवाक व्हाल. त्याचे नाव योगराज सिंग असुन त्यांनी एमएस धोनीची प्रशंसा केली आहे. योगराज सिंग म्हणाले कि एमएस धोनी हा महान खेळाडू असून मी त्याचा फॅन आहे. या विधानाने क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
“मी असं कधीच म्हणालो नव्हतो. पराभवासाठी मी धोनीला कधीही जबाबदार ठरवलं नव्हतं. तुम्ही चुकीच्या माणसाला चुकीचा प्रश्न विचारलात. गेली अनेक वर्ष धोनी भारतीय संघाचं समर्थपणे नेतृत्व करतो आहे, यात काहीच वाद नाही. तो महान खेळाडू आहे, मी त्याचा चाहता आहे. ज्या पद्धतीने तो संघ हाताळतो, खडतर परिस्थितीत निर्णय घेतो हे वाखणण्याजोगं आहे.” असे योगराज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
याआधी माजी भारतीय क्रिकेटपटू आणि युवराजसिंगचा वडील योगराज सिंग यांनी आयसीसी वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध पराभवासाठी धोनीला दोषी ठरवले होते. तसेच एमएस धोनीने युवराज सिंगच्या करियर खराब केल्याचा आरोप केला होता.त्यामुळे त्यांनी आता दिलेल्या विधानात त्यांनी घुमजाव केल्याचे बोलले जात आहे.