लग्न कधी करायचा हा प्रश्न प्रत्येकासमोर कधी ना कधी समोर येतोच. मात्र यामध्ये काही महत्वपूर्ण बाबी आहेत. त्या म्हणजे काही मुलांचे लग्न त्याच्याहून कमी वयाच्या मुलीशी होते, तर काहींचे त्यांच्याहून वयाने मोठ्या असणाऱ्या मुलीशी होते. यामध्ये वयाने मोठ्या असणाऱ्या मुलीशी लग्न करणे हे खूप फायद्याच असते. चला तर मग जाणून घेऊयात या वयातील साम्यामुळे काय फायदे होतात.
फायदे
- वयाने कमी असलेल्या मुलाशी लग्न करणाऱ्या मुली या त्याच्या नवऱ्यापेक्षा खूप जबाबदार असतात. त्यामुळेजर एखाद्या तरुणाने वयाने मोठ्या मुलीशी लग्न केले तर त्याला कुठल्याही जबाबदारी बाबत चिंता करण्याची गरज नाही. कारण वयाने मोठ्या मुली सहजपणे आपल्या पतींना कुठल्याही समस्येपासून बाहेर काढू शकतात.
- वयाने मोठ्या असलेल्या मुलीशी लग्न करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्या आत्मनिर्भर असतात. त्या स्वतःचे काम स्वतः करतात. त्या कोणत्याही ही गोष्टींसाठी आपल्या पतीवर निर्ताभर नसतात.
- सासरच्यांसोबत चांगले नाते सबंध टिकवणे हे वयाने मोठ्या असलेल्या पत्नीला चांगले जमते. त्यामुळे जय महिलेने सासर चांगले सांभाळले तिचा संस्सार नक्कीच सुखाचा होतो.
- वयाने मोठ्या असलेल्या महिला यांना आपल्या पतीहून आयुष्याचा दांडगा अनुभव असतो. त्यामुळे आयुष्यात कुठलेही संकट ओढवल्यास त्या त्या संकटावर मात करतात. अशावेळी त्या चांगल्या परिस्थिती सभाळतात.
- वयाने मोठ्या मुलीशी लग्न हे आर्थिक दृष्टया फायद्याच असते. कारण या महिला आर्थिक दृष्टया मजबूत असतात. त्यामुळे घरात कमावणार तुम्ही एकटे असाल तर तुम्हाला घर चालवण्यास त्यांचा चांगला हातभार लागतो.
- वयाने मोठ्या मुली या खूप जबाबदार असतात. त्यांच्यासाठी प्रत्येक नाते हे महत्वाचे असते. त्यामुळे त्या आपल्या पाटील शेवटपर्यंत चांगली साथ देतात.तसेच वयाने कमी असलेल्या महिलांमध्येही असा गुण असतो.