Ads
टेक- टॉक

शाओमचीच्या K20, K20 Pro चा आज सेल; जाणून घ्या फीचर्स, ऑफर्स

Redmi K20 and K20 Pro
डेस्क desk team

शाओमी या लोकप्रिय चिनी कंपनीने काही दिवसांपूर्वी भारतामध्ये आपले नवे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. Redmi K20 आणि K20 Pro अशी त्या स्मार्टफोनची नावे आहेत. तर या स्मार्टफोनचा आज पहिला सेल कंपनीने आयोजित केला आहे. हा सेल फ्लिपकार्ट या इ-कॉमर्स संकेतस्थळावर आणि mi.com या संकेतस्थळावर आज दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होणार आहे.  तसेच या स्मार्टफोनच्या सेलवर कंपनीने  विशेष सवलत दिली जाणार आहे.

ऑफर

भारतात शाओमीने Redmi K20 या स्मार्टफोनची किंमत २१,९९९ आणि K20 Pro याची किंमत २७,९९९ इतकी ठेवण्यात आली आहे. एअरटेलच्या ग्राहकांना एअरटेल थँक्स गोल्डचे देखील फायदे मिळणार आहे. याशिवाय ICICI बँकेच्या क्रेडिट अथा डेबिट कार्डने खरेदी केल्यास या फोनवर १ हजार रुपयांची सूट मिळणार आहे.

Redmi K20 फीचर्स

 • ६.३९ इंच AMOLED डिस्प्ले
 • स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर
 • क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३० एसओसी प्रोसेसर
 • ६ जीबी रॅम+१२८ जीबी इंटरनल स्टोरेज
 • अँड्रॉइड ९ पाय(MIUI १०)
 • ४८+१३+८ मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप
 • सेल्फिसाठी २० मेगापिक्सल कॅमेरा
 • ४०००mAh फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह बॅटरीची क्षमता

Redmi K20 Pro फीचर्स 

 • ६.३८ इंच फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले
 • स्नॅपड्रॅगन ८५५ एसओसी प्रोसेसर
 • ८ जीबी रॅम+२५६जीबी इंटरनल स्टोरेज
 • MIUI १० ऑपरेटिंग सिस्टिम
 • Sony IMX586 सेंसरसह ४८+१३+८ मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप
 • सेफ्लिसाठी २० मेगापिक्सल पॉप अप सेल्फि कॅमेरा
 • ४००० mAh बॅटरीची क्षमता

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: