गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतीवर संकट ओढवले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या वरून राजाला विनवणी करण्यासाठी नाशिकमधल्या एका गावात शेतकरी पारंपारिक नृत्य करत पावसाला गाऱ्हाण मांडताना दिसतायत. या संदर्भातला व्हिडीओही समोर आला आहे.
नाशिकमधल्या कळवण तालुक्यातील मळगाव खुर्द येथील छोट्याश्या गावात सुरुवातीला पाऊस खूप पडला. यावेळी शेतकरी सुद्धा पेरणीला लागला. मात्र पेरणी नंतर लगेचच पाऊस विसावला.त्यामुळे शेतात आलेली पिक सुकून गेली. शेतकऱ्यावर यामुळे शेतीचे संकट उभे राहिले.
दरम्यान पाऊस पुन्हा पडून शेतीला तेजी यावी यासाठी ग्रामस्थ या समस्येसाठी एकत्र आले आहेत. आणि आपली ग्रामदेवता असलेल्या हनुमानाच्या मंदिराबाहेर वाद्य वाजवून महिलांनी डोक्यावर हंडा घेऊन पारंपारिक नृत्य करत वरूणराजाला गाऱ्हाण मांडल. या हंड्यात पाणी आणि लिंबाचा पाला असतो.यामध्ये पाऊस पडावा व शेतकऱ्याची चांगली शेती व्हावी अशी मागणी केली जाते. दरम्यान हि प्रथा तेथील आदिवासी लोकांमध्ये आहे.

मी बातमीदार सुनील वाघ नाशिक