मृत्यू हा कोणालाच चुकत नाही. मग तो गरिब असो किंवा श्रीमंत. एका ठराविक वयानंतर, काळा नंतर मृत्यू अटळ असतो. माणसाची श्वसन क्रिया बंद झाली म्हणजेच ह्द्य बंद पडले की माणसाचा मृत्यू होतो. मृत्यूनंतर सर्व प्रथम माणसाचे ह्दय बंद पडते, हात-पाय थंड पडायला सुरवात होते. काही ठराविक तासांनंतर माणूस ज्या स्थितीत मेला तो तसाच राहतो, त्याचे हात किंवा पाय यांच्या स्थितीत बूदल करता येत नाही. मात्र माणसाची नखे आणि केस हे मृत्यू नंतर देखील वाढतात असे म्हंटले जाते. मात्र खरच अस होत का ? जाणून घेऊयात.
अशी वाढतात नख आणि केस
नखांच्या वाढीसाठी ग्लुकोज असणे गरजेचे असते. ग्लुकोजमुळे नखे वाढवणाऱ्या कोशिका तयार होत असतात. मानवी शरीरातील केस आणि नख यांच्या वाढिचे एक गणित आहे. नखांची वाढ ही वाढत्या वयाबरोबर हळुहळु मंदावत असते. साधारण 0.1 च्या वेागाने नखांची वाढ होत असते. मात्र माणसाच्या मृत्यू नंतर इतर सर्वच गोष्टीं प्रमाणे ग्लुकोजच्या पुरवठ्यावर देखील प्रतिबंध लागतो. त्यामुळे मृत्यू नंतर नखांची तसेच केसांची वाढ होते या गोष्टीत काहीही तथ्य नाही.
शरीराची वाढ ?
मृत्यू नंतर लगेचच माणसाच्या शरिर फुगु नये, सूज येऊ नये यासाठी मृत्यू नंतर माणसाच्या नाकात, कानात कापसाचे बोळे टाकले जातात. तोंड आणि डोळे बंद असतील तर ते देखील बंद केले जातात. माणसाचा बुडून मृत्यू झाला तर अशा वेळी शरीर फुगते. त्यामुळे मृत्यू नंतर माणसाच्या शरिराच्या कोणत्याही अवयवाची नखांची किंवा केसांची वाढ होणाऱ्या गोष्टीत काहीही तथ्य नाही.