वृषाली कोतवाल – तृतीयपंथी म्हणजे ज्यांना समाज्यात हिजडा, किन्नर, छक्का या नावाने ओळखले जाते. या नागरिकांना पुरूष असूनही स्त्री सारखे वागावे लागते. अशा नागरिकांना तृतीयपंथी बनण्याची जबरदस्ती नसते मात्र, इतर समाज्यातील लोक त्यांना स्विकारत नाही त्यामुळे त्यांना हे जीवन जगावे लागते. अनेक वेळा तृतीयपंथी आपल्या आसपास वावरताना नेहमी मनात प्रश्न निर्माण होतात. तृतीयपंथीचे आयुष्य नेमक कसे असेल? ते इतर नागरिकांसारखे का नसतात? त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी उघड का नसतात? त्याच्या काही गोष्टी लपवल्या जातात की गोपनीय ठेवली जातात? त्यांच्या संबंधीत अनेक गोष्टी या आपल्याला माहितच नसतात. त्यामुळे आज तृतीयपंथींबद्दल अशा गोष्टी सांगणार आहोत ते तुम्हाला माहीत नसेल…
वर्षातून फक्त एक दिवस करतात लग्न
तृतीयपंथी यांचे लग्न होते का? हा प्रश्न आपल्याला पडतो. तर तृतीयपंथी हे वर्षातून फक्त एक दिवस लग्न करतात. हे त्यांचे लग्न भगवान अरावन यांच्या मुर्तीसोबत होत. त्या दिवशी पूर्ण गाव भऱ फिरवले जाते. तर दुसऱ्या दिवशी तृतीयपंथी आपला शुंगार काढून विधवा महिले प्रमाणे शोक व्यक्त करतात.
वार्षिक सोहळा
तृतीयपंथी व्यक्तींचा वार्षिक सोहळा वर्षातून एकदा येतो. हा सोहळा चेन्नईपासून २०० मिल अंतरावर असलेल्या कूवगम गावात होतो. येथे संपूर्ण भारतातील तृतीयपंथी एकत्र येतात. तामिळ नववर्षातील पहिली पोर्णिमापासून १८ दिवसांपर्यंत हे सेलिब्रेशन सुरु असते. तर १७ व्या दिवशी तृतीयपंथीचे देवता भगवान अरावन यांची पूजा करतात १८ व्या दिवशी संपूर्ण कूवगम गावात अरावन यांची प्रतिमा फिरवली जाते आणि त्यानंतर ती प्रतिमा तोडण्यात येते मग पत्नी बनलेला तृतीयपंथी आपले मंगळसुत्र काढून टाकले जाते.
रहस्यमय अंत्यसंस्कार
तृतीयपंथीचे मृत्यू झाल्यानंतर त्यांचे अत्यंसंस्कार कसे केले जाते हे सगळ्यानाच माहित नसते. तृतीयपंथी व्यक्तीची शवयात्रा रात्रीच्या वेळी काढण्यात येते. तसेच सामान्य व्यक्तींना तृतीयपंथीयांचे अंत्यसंस्कार पाहण्याची परवानगी नसते असे मानले. कारण जर असे अंत्यसंस्कार पाहिल्यास मृत तृतीयपंथीला पुढील जन्म हा तसाच होतो अशी समज आहे. त्यामुळे त्यांच्यावरील अंत्यसंस्कार रात्रीच्यावेळी केला जाते.
तृतीयपंथीचा एक गुरू
प्रत्येक तृतीयपंतीचा एक गुरु असतो. असे म्हणतात की आपल्या शिष्याचा मृत्यू कधी होणार हे त्या गुरुला माहिती असते. जो जन्मापासूनच तृतीयपंथी असतो तो आपल्या गुरुची प्रत्येक गोष्ट मानत असतो. जो ऑपरेशन करुन तृतीयपंथी बनला आहे, तो कधीच कोणता गुरु बनवत जात नाही.