Ads
बातम्या

नवऱ्याला या गोष्टी कळु नये असं बायकांना वाटत

Husband-women relation
डेस्क desk team

तुषार गोसावी : नवरा बायकोच नात हे बहुदा ‘तुझ माझ जमेना, ‘तुझ्या वाचुन करमेना’ असच असत. आपला नवरा बाहेर गेल्यावर काय करतो हे जस बायकांना जाणून घ्यायच असत, तसच बायका नवऱ्यांपासून कोणत्या गोष्टी लपवतात हे जाणून घेण्यासाठी नवरे देखील उत्सुक असतात. बऱ्याचदा अस म्हंटल जात की बायकांच्या मनात नेमक काय चालय आणि कधी काय येईल हे सांगण खुप कठीण आहे. मात्र तरीही बायका नवऱ्यांपासून कोणकोणत्या गोष्टी लपवतात ते जाणून घ्या.

पैसे

अनेक वेळा बायका आपल्या घर खर्चातुन पैशांची बचत करत असतात. हे पैस ते घरात अशा ठिकाणी ठेवतात जिथुन ते कोणालाच सापडणार नाही. बायका या पुरुषांच्या बाबतीत खुप काट कसर करतात. त्यामुळेच ज्याची बायको हुशार आणि काटकसर करणारी त्याच्या संसार चांगला होतो असे देखील म्हटले जाते. मात्र घरात जेंव्हा एखादी आर्थिक अडचण असते तेंव्हा बायका त्यांच्याकडे साठवलेले पैसे काढतात.

नवऱ्याचा खोटेपणा सहतात

पुरुष हे कामासाठी दिवसाचे जवळपास बारा ते पंधरा तास घराबाहेर असतात. त्यामुळे नवऱ्याने घरी आल्यावर आपल्यालाच वेळ द्यावा अस त्यांना वाटत असत, आणि ते साहाजिक असत. बहुतेकदा नवरे बाहेरुन जेवुन येतात आणि घरी आल्यावर पोट खराब आहे अस सांगतात. बऱ्याचदा मित्रांबरोबर पिक्चरला जातात, फिरायला जातात आणि घरी ट्राफिक होती, आज लेट सुटलो अशी खोटी कारण देतात. बहुतेकदा बायकांना या गोष्टी माहिती असतात, मात्र त्या व्यक्त होत नाही. मात्र जेंव्हा नवरा बायकोमध्ये वाद होतात, तेंव्हा मात्र या सगळ्याचा उद्रेक होतो.

शॉपिंग

पुरुषांच्या तुलनेत महिला खुप मोठ्या प्रमाणैत शॉपींग करत असतात. महिलांसोबत शॉपिंग करणे हा पुरुषांसाठी खुप मोठा टास्क असतो. तेंव्हा शक्यतो पुरुष महिलांसोबत शॉपिंगला जाणे टाळतात. चप्पल आणि साडी या दोन गोष्टींची शॉपिगं महिला जास्त करतात. मात्र बऱ्याचेळा ही गोष्ट त्या नवऱ्यापासून लपवतात.

आजारपण

बायका या परुषांच्या तुलनेत जास्त सहनशील असतात. महिला बहुतेकदा लहान सहान कारणासाठी दवाखान्यात जाणे टाळतात. बायका संसारात, मुलांमध्ये इतक्या गुरफटलेल्या असतात की बहुतेकदा आपल्याला होणारा त्रास त्या अंगावर काढतात. रात्री कामावरुन घरी आलेल्या नवऱ्याला त्या आपल्याला होणारा त्रास सांगणेही टाळतात. बहुतेकदा नवऱ्याचा सुखद स्पर्श हेच त्यांच्यासाठी औषध असत.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: