आज १६ जुलै हा दिवस गुरूपौर्णिमा म्हणजेच आपल्या गुरूजनांना प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. मात्र, आज १४९ वर्षानंतर प्रथमच गुरुपौर्णिमा आणि खंडग्रास चंद्रग्रहण पहायला मिळणार आहे. या दुर्मिळ योग २०१९ या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आहे. तर भारतामध्ये पुढील चंद्रग्रहण २६ मे २०२१ रोजी पाहता येणार आहे. हे चंद्रग्रहण भारतासह ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, आशिया, यूरोप आणि दक्षिण अमेरिकेत दिसणार आहे.
दरम्यान, या चंद्रग्रहणाचा कालावधी १६ जुलै आषाढ पौर्णिमेच्या रात्री १.३० वाजल्यापासून ते १७ जुलैच्या पहाटे ४.३० वाजे पर्यंत म्हणजेच सुमारे ३ तास हा चंद्रग्रहण चालणार आहे. वेधारंग आज (१६ जुलै) दुपारी ४ वाजल्यापासून सुरू होणार आहे.
ग्रहण म्हटले की, यासंबंधी अनेक समज, गैरसमज असतात. सामान्य माणसांसोबत गर्भवती स्त्रिया आणि अर्भक यांना देखील ग्रहणाचा धोका असतो, असे मानले जाते. तर नेमकी या ग्रहणात काय काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेऊयात…
- ग्रहणाच्या दिवशी जर तुम्हाला पाणी प्यायचे असेल तर त्यात तीळ किंवा तुळशीची पाने अवश्य टाका.
- ग्रहण संपल्यानंतर आंघोळ करुन देवघरातील देवांना देखील चांगली आंघोळ घालावी. तसेच संपूर्ण घरात धूप-बत्तीने शुद्धीकरण करावे.
- चंद्रग्रहणावेळी गरीबांचा अपमान करु नका. नदीत नारळ अर्पण करावा.
- गर्भवती महिलानी ग्रहण पाहू नये. मात्र, हा नियम गर्भवतांनाच नाही तर सर्वांनाच लागू होते.