Ads
बातम्या

Oppo चा F11 Pro पुन्हा नव्याने लाँच; जाणून घ्या खास फीचर्स

Oppo F11 Pro waterfall grey variant
डेस्क desk team

लोकप्रिय चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने आपल्या F11 Pro या स्मार्टफोनचं एक नवीन व्हेरिअंट बाजारात आणल आहे. तर हा स्मार्टफोन ‘वॉटरफॉल ग्रे’ या नव्या रंगामध्ये आणि नव्या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.  हा फोन ‘अॅमेझॉन प्राईम डे’ सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या नव्या व्हेरिअंटची किंमत २३,९९० रुपये इतकी आहे.

फीचर आणि ऑफर

  • F11 प्रो या स्मार्टफोनमध्ये प्रायमरी रिअर कॅमेरा तब्बल ४८ मेगापिक्सल आहे. तर १२ मेगापिक्सलचा सेंकडरी सेंसर कॅमेरा आहे.
  • पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे, १६ मेगापिक्सल रिअर कॅमेरा असणार.
  • स्मार्टफोन Mediatek Helio P70 प्रोसेसर नुसार चालणार आहे.
  • बॅटरी ४,००० mAh आहे, तर १५ तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देईल.
  • ६.५ इंचांचा एलसीडी डिस्प्ले आहे. इतर फोनप्रमाणे याला फिंगर प्रिंट सेंसरही देण्यात आले आहे.
  • सेलमध्ये हा फोन एचडीएफसी बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास १० टक्के सवलत देखील मिळेल.
  • जुना फोन देऊन एक्सचेंज ऑफरचाही लाभ घेऊ शकतात.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: