Ads
स्पोर्टस

लता मंगेशकर यांनी केली धोनीला विनंती

Lata Mangeshkar
लता मंगेशकर
डेस्क desk team

आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमीफाइनलमध्ये न्यूझीलंडने भारताला १८ धावांनी पराभूत केले. वर्ल्ड कप आधी आणि वर्ल्ड कप नंतर एम. एस. धोनीच्या रिटायरमेंट बद्दल खूप चर्चा सुरु आहे. यात एम. एस. धोनीने रिटायरमेंट घेऊ नये म्हणून एका दिग्गज व्यक्तीने एम. एस. धोनी विनंती केलीय. ही दिग्गज व्यक्ती आहे गाणकोकिळा लता मंगेशकर.

लता मंगेशकर धोनीच्या रिटायरमेंटच्या विचाराशी सहमत नाहीत. धोनीच्या निवृत्तीवर लता मंगेशकर यांनी ट्विट केलं की,  “नमस्कार एम. एस. धोनी जी मी काल पासून ऐकतय की तुम्हाला रिटायर व्हायचे आहे. कृपया असा विचार करू नका. देशाला तुमची गरज आहे आणि ही माझी विनंती आहे की तुम्ही रिटयरमेंटचा विचार मनात आणू नका”.

न्यूझीलंडविरुध्द एम. एस. धोनीने ५० धावांची खेळी केली होती. रविंद्र जडेजा (७७ धावा) करत शतकीय भागीदारी करुन संघाला विजयासमीप आणले होते.दरम्यान लता मंगेशकर यांच्या विनंतीवर धोनीवर अद्यप काही प्रतिक्रिया दिली नाहीये. मात्र त्याने निवृतीब्बत अद्याप तरी काहीच बोलले नाही आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीय सुखावला आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: