Ads
बातमीदार स्पेशल

धोनीला वाढदिवसाच्या ‘कुल’ शुभेच्छा ! कर्णधार ते प्रेरणास्त्रोत पर्यतची यशस्वी वाटचाल

डेस्क desk team

क्रिकेट विश्वातला यशस्वी खेळाडू आणि युवा क्रिकेटपटूचा प्रेरणास्त्रोत असलेला भारताचा यशस्वी विकेटकीपर आणि बॅट्समन महेंद्र सिंग धोनी याचा आज वाढदिवस.आज धोनी ला ३८ वर्ष पूर्ण झाली, मात्र त्याचामध्ये आजही एका युवा क्रिकेटपटूसारखी चपळता आहे. वाढदिवसानिमित्त कॅप्टन कुल महेंद्र सिंग धोनीला ‘बातमीदार’ तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

महेंद्र सिंग धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ ला झारखंड मधील रांची येथे झाला. अतिशय बिकट परिस्थितीतून झुंजत त्याने आपले क्रिकेट मधले करीयर घडवले. मैदानावर त्याला  कॅप्टन कुल म्हणूनही ओळखले जाते. या वयातही त्याची चपळता युवा खेळाडुंना प्रेरणा देणारी ठरते.धोनी हा भारतीय टीमचा एक अविभाज्य भाग मानला जातो. त्याच्या मैदानावरील असण्यानेच भारत अर्धा सामना जिंकतो असे म्हटले जाते. त्याचा २०११ च्या विश्वचषकातल्या फायनल सामन्यातला सामना जिंकवून देणारा सिक्सर आजही क्रिकेटप्रेमींच्या लक्षात आहे.

काही रंजक गोष्टी

 • पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना हा बांग्लादेश विरुद्ध २००४ मध्ये खेळला. यात तो पाहिल्याचं चेंडू वर एकही धाव न घेता बाद झाला होता.
 • रणजी ट्रॉफी १९९९-२००० साठी वयाच्या १८ व्या वर्षी पदार्पण केले.
 • पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट शतक त्याने चौथ्या सामन्यामध्येच झळकावल होत.
 • धोनी भारतीय एकदिवसीय क्रिकेट तसेच टी-२० संघाचा कर्णधार होता.
 • क्रिकेट इतिहासात एकदिवसीय क्रिकेट संघाचा, धोनी एक यशस्वी कर्णधार मानला जातो.
 • धोनी कर्णधार असताना भारताने पहिले  आयसीसी टी-२० विश्वचषक (world cup) २००७ मध्ये जिंकले.
 • धोनीने त्याच्या कर्णधार कालावधीत श्रीलंका व न्यूझीलंड मध्ये प्रथम ODI सिरीजवर विजय प्राप्त केले.
 • लागोपाठ सात वर्ष (२००८-२०१३) पर्यंत ICC World One Day Eleven मध्ये सहभागी झाला होता.
 • तब्बल २८ वर्षानंतर भारताने २०११ ला  World Cup जिंकला होता.या संघाचे कर्णधारपद एम एस धोनीकडे होते. या फायनल सामन्यात धोनीने सिक्सर मारून विश्वचषक उंचावलेला.
 • २०१३ मध्ये प्रथमच भारताने Champions Trophy देखील पटकावली.
 • धोनी जगातील पहिला असा कर्णधार आहे ज्याचे नाव ICC च्या सर्व (CUP आणि Trophy) चषकांवर आहे.
 • धोनीच्या कर्णधार काळात भारताने १०० हून अधिक ODI सामने जिंकले.  असा विक्रम करणारा तो भारताचा एकमेव कर्णधार बनला आहे
 • ODI सामन्यात ७ व्या क्रमांकावर खेळून देखील २०१२ मध्ये पाकिस्तानच्या विरुद्ध शतक झळकावले.
 • धोनी कर्णधार रुपात सर्वात जास्त सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच जास्त क्रिकेट सामने जिंकवून देण्यात येणाऱ्या कर्णधार मध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 •  IPL च्या प्रथम सत्रातला सर्वात महाग खेळाडू होता, ज्याने CSK सोबत १.५ दशलक्ष डॉलर मध्ये करार केला होता.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: