Ads
स्पोर्टस

अंबाती रायडूची क्रिकेटमधून निवृत्ती

ambati rayudu
अंबाती रायडू
डेस्क बातमीदार

 गेल्यावर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला भारतीय फलंदाज अंबाती रायडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या या अचानक अशाप्रकारच्या निवृत्तीच्या घोषणेने क्रिकेटविश्व हादरले आहे. दरम्यान विश्वचषकात त्याला स्थान न मिळाल्यामुळे त्याने निवृत्ती घेतल्याचे बोलले जात आहे.

विश्वचषकांमध्ये रायडू राखीव खेळाडूंमध्ये होता. मात्र, विजय शंकर आणि शिखर धवन दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतरही निवड न झाल्यामुळे रायडूने निवृत्तीची घोषणा केल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी रायडू आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे.

रायडूने २००४ मध्ये अंडर-१९ च्या भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले होते.रायडूने भारतीय संघाकडून ५० एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये ४७ च्या सरासरीने १६९४ धावा केल्या आहेत. रायडूची सर्वोत्कृष्ट खेळी नाबाद १२४ धावांची आहे. रायडूने तीन शतके आणि दहा अर्धशतके झळकावली आहेत. रायडूला टी-२०मध्ये आपला प्रभाव दाखवला आला नाही. टी-२० मध्ये रायडूने फक्त ४२ धावा केल्या आहेत.

 

About the author

बातमीदार

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: