Ads
Happy To Help

‘परे’वर महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘सखी’ कार्यरत

western railway
सखी व्हॉट्सअॅप ग्रुप क्रमांक
डेस्क desk team

मुंबईमधील प्रत्येक महिला ही कामासाठी असो किंवा कुठल्या ना कुठल्या कामासाठी रेल्वेने प्रवास करीत असतात. अनेक रात्रीच्या किंवा दिवसांच्या वेळेस महिलांसोबत छेडछाड करण्याचा आणि त्यांच्या सोबत गैरवर्तन झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे काही वेळा रेल्वेत प्रवास करताना महिलाना रात्रीच्या वेळेस भीती वाटते. त्यामुळे आता महिलांच्या सुरक्षतेसाठी रेल्वे प्रशासनाने चांगला प्रयत्न केला आहे.

पश्चिम रेल्वे स्थानकातील महिलांच्या सुरक्षतेसाठी प्रशासनाने सखी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. यामुळे रेल्वेमध्ये महिलांना कोणताही अडथळा आला किंवा कोणती समस्या निर्माण झाल्यास प्रशासनाने जाहीर केलेल्या क्रमांकावर फोन किंवा मॅसेज करून मदत मिळवू शकतात. ‘९००४४४९६९८ हा प्रशासनाने सखी व्हॉट्सअॅप ग्रुप क्रमांक’ जाहीर केला आहे. तसेच १८२ या क्रमांकावरून ही महिल्या आपल्या समस्या कळवू शकतात.

दरम्यान, हा व्हॉट्सअॅप क्रमांक थेट आरपीएफच्या महिला अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येणार आहे. संबंधीत क्रमांकावर आपली तक्रार दाखल केल्यावर तातडीने मदत केली जाणार आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: