मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसांनी धुमाकुळ घातला होता. या पावसामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले तर काही ठिकाणी दुर्घटनाही घडल्या, तर या दुर्घटनेत 20 हून अधिक नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला.
मंगळवारी मालाडमध्ये भिंत पडली, चांदिवली परिसरातही रस्ते खचल्याचा प्रकार घडला त्यामुळे तेथील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. तसेच कल्याणमध्ये ही भिंत कोसळली. त्यामुळे अश्या दुर्घटना घडल्यावर नेमक काय कराव हे कळत नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने काही आप्तकालीन क्रमांक जाहीर केले आहेत. ते क्रमांक जाणून घ्या.
आप्तकालीन क्रमांक
- महाराष्ट्र नियंत्रण कक्ष: 022-22027990, फॅक्स: 022-22026712
- बृहन्मुंबई महानगरपालिका आतत्कालीन ऑपरेशन केंद्र: 1916, 022-22694725, 022-22694727, 022-22704403
- मुंबई- अग्निशमन आपत्कालीन टेलिफोन क्रमांक: 101 किंवा 022-23076111, 022-23086181,022-23074923, 022-23076112/13
- आपत्ती व्यवस्थापन कक्ष कंट्रोल रुम: महापालिका मुख्यालय, अनेक्स इमारत. तळघर, महापालिका मार्ग, मुंबई- 4000 001 संपर्क: 022-22694719/25/27