भारताची काल अपराजित मालिकांची कसोटी संपली.इंग्लंडच्या डोंगरा एवढ्या भारताला पूर्ण करता न आल्याने भारताचा पराभव झाला. या पराभवासोबत भारताला आणखीन एक मोठा झटका बसलाय.विजय शंकरला दुखापत झाली आहे. त्यामुळे भारतीय संघापुढे दुखापतीचे सत्र सुरु आहे.
नेट्समध्ये सरावा दरम्यान जसप्रीत बुमराहचा बॉल विजयच्या पायला लागला होता. दरम्यान सुरुवातीला दुखापत फारच गंभीर दिसत नव्हती परंतु नंतर गंभीर झाली.त्यामुळे विजय शंकर इंजरीमुळे वर्ल्ड कप बाहेर झाला आहे. त्यामुळे आता त्याच्याऐवजी मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यरला संधी मिळू शकते.
दरम्यान असे पाहायला गेला तर या वर्ल्ड कपमध्ये विजय शंकर कामगिरी देखील काही खास नव्हती. त्याला 3 सामन्यात संधी मिळाली ज्यामध्ये 29 सरासरीने त्याने 58 धावा केल्या. याशिवाय 2 बळी घेतले होते.