Ads
मनोरंजन

‘ये रे ये रे पैसा 2’ पहिली झलक रसिकांच्या भेटीला

डेस्क desk team

‘अण्णा परत येतोय’ या मेसेजने सोशल मीडियामध्ये मागील काही दिवसांपासून अनेक मिम्स व्हायरल होत होते. मात्र आता याचा उलगडा झाला आहे. हा अण्णा म्हणजे ‘ये रे ये रे पैसा 2’  मधील संजय नार्वेकर आहे. ‘ये रे ये रे पैसा’ या सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याची आता अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मात्र आता हा सिनेमा हेमंत ढोमे  दिग्दर्शित करणार आहे.

‘येरे येरे पैसा’ सिनेमाच्या पहिल्या भागात उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, मृणाल कुलकर्णी हे कलाकार खास भूमिकेत दिसले होते. तर अण्णा या भूमिकेत असलेला संजय नार्वेकर दक्षिण आफ्रिकेला गेला होता. मात्र येरे येरे पैसा 2 मध्ये तो भारतामध्ये परतणार असल्याने वसुली डबल होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. येरे येरे पैसा 2 हा सिनेमा 9 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: