वसई-विरार वासीयांना पावसाने झोडपले असतानाच आता त्यांच्यावर आणखी संकट उभ ठाकणार आहे. शहराला पाणी पूरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्रच बंद पडले आहे. त्यामुळे नागरिकांसमोर पाणी संकट निर्माण होणार आहे.
पालघर जिल्ह्यात काल सकाळपासूनच पावसाने धुमाकूळ घातलाय. यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झालीय. या पुराचा फटका आता वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख जलशुद्धीकरण केंद्राला बसला आहे.सूर्या धरणाच्या मासवण पंपिंग स्टेशन आणि धुकटन फिल्टर प्लांटला पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने पंपिंग स्टेशन पूर्ण पणे बंद पडले आहे. तसेच म रा वि म(MSEB) च्या मासवण येथील सबस्टेशन मध्ये झालेला बिघाड ही दुरुस्ती करण्यात अडचणीत येत आहेत. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा खंडित झाला आहे.
दरम्यान हे केंद्र दुरुस्ती करण्याचे वसई-विरार महापालिकेचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या केंद्राला दुरुस्त व्हायला किती वेळ लागेल याची काही शाश्वती नाही आहे. त्यामुळे हे केंद्र लवकरच दुरुस्त न झाल्यास संपूर्ण वसई विरारचा पाणी पुरवठा अनिश्चित काळासाठी बंद पडेल. याचा 25 लाखाहुन अधिक नागरीकांना फटका बसणार आहे. त्यामुळे वसई-विरार वासीयांवर एन पावसाळ्यात पाणी संकट ओढवणार आहे.
– वि.वि.एम.सी पाणी पुरवठा विभाग