वसईमध्ये अँब्युलन्समधून गावठी दारूची वाहतूक सुरु असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या घटनेत पोलिसांनी ४८० लिटर गावठी दारू जप्त केली. त्यामुळे अशाप्रकारे जर अँब्युलन्समधून दारूची वाहतूक सुरु राहिलीच तर रुग्णासाठी आता धावणार कोण असा सवाल रुग्णांचे नातेवाईक विचारत आहेत.
वसईच्या मालजीपाडामध्ये रुग्णांना मृत्युच्यादाढेतुन बाहेर काढण्यासाठी धावणाऱ्या अँब्युलन्समधूनच गावठी दारूची वाहतूक झाल्याची बातमी समोर आली आहे. वालीव पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत पोलिसांनी MH 04 FK1868 नावाची अँब्युलन्स अडवली. या अँब्युलन्सची तपासणी केली असता त्यामध्ये 3 रबर ट्यूब, 9 प्लास्टिकच्या गोण्यासह 480 लीटर गावठी दारू जप्त केली. विशेष म्हणजे अँब्युलन्समध्ये मृत शव ठेवणाऱ्या पेटील हि दारू ठेवून वाहतूक केली जात होती.
या प्रकरणी वालीव पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. मात्र गुन्हेगारांवर अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही आहे. या घटनेमुळे रुग्णानप्रती तत्पर असणाऱ्या अँब्युलन्स चालकांनी आपली प्रतीमा मलीन केली आहे. तसेच उद्या अँब्युलन्स एका वाहतूक कोंडीत सापडल्यास कोणीही तिला रस्ता खुला देण्यास तयार होणार नाही. यामुळे असंख्य रुग्णही दगावतील. त्यामुळे आता अशा अँब्युलन्स चालकांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जेणेकरून अशा घटना पुन्हा होणार नाहीत.