जुलै महिना सुरू झाला कि खऱ्या अर्थाने पावसाला सुरूवात होते. तसेच याच महिन्यापासून विविध सणांना सुरूवात होते. तर भारतातले काही सण हे पावसाशी संबंधीत असल्याने मान्सूनच्या दरम्यान अनेक सण साजरे केले जातात. त्यामुळे या सणांमध्ये सहभागी होऊन तिथली संस्कुतीचा सर्वांचा अनुभव घेता येईल. तर आता जाणून घेऊयात जुलै मधील सणांबद्दल…
आषाढी एकादशी
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरची वारी महाराष्ट्रात जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरूवात होते. ही वारी सलग २२ दिवस चालते. तसेच ही वारी अनुभवण्यासाठी वेगवेगळ्या गावातून भक्त सहभागी होत असतात.
पुरी रथ यात्रा
पावसाळ्यात फिरण्यापेक्षा एखाद्या रंगारंग फेस्टिवलचा आनंद लुटायचे असेल तर जगन्नाथपुरीचा रथ उत्सवला भेट निक्की द्या. हा उत्सव १२ दिवस चालतो. या रथ उत्साहामध्ये स्थानिक संस्कृतीचे ही चांगलेच दर्शन होते. ही रथयात्रेचे दर्शन दरवर्षी आषाध महिन्यात होतो. या उत्साहात कृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्या वजनदार मुर्त्या विराजमान करून तो रथ ओढण्याची पद्धत आहे. यावर्षी हा उत्सव ४ जुलैला संपन्न होणार आहे.
अमरनाथ यात्रा
अमरनाथ यात्रा ही जुलैच्या १ तारखेला सुरू होते आणि १५ ऑगस्टला श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनच्या दिवशी ती यात्रा संपते. ही यात्रा तब्बल ४५ दिवस चालते. ही यात्रा ३० जून ला जम्मू येथिल शिविर भगवती नगप येथून निघते. त्यानंतर ही यात्र आणि यात्रेकरू बालटाल आणि पहलगाम येथून अमरनाथ येथे मार्गस्थ होतात.
बोनालु महोत्सव
तेलंगाना मधील विशेष उत्सवांपैकी बोनालु हा एक उत्सव आहे. या उत्सवात देवी महाकालीची पूजा केली जाते. बोनालु म्हणजेच प्रसाद, देवीने आपल्या पूर्ण केलेल्या इच्छेबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते.
द्री फेस्टिव्हल
अरुणाचल प्रदेश आणि अपातानी जातीच्या लोकांचा हा एक महत्त्वाचा कृषी उत्सव आहे. अपातानी या लोकांचा हा सण बलिदान आणि त्यागाशी निगडीत असतो. हा उत्सव ५ जुलैला साजरा केला जातो. या फेस्टिव्हलमध्ये लोककथा, पारंपारिक नृत्य आणि विविध कार्यक्रम सादर केले जातात.