भारतीय क्रिकेटप्रेमीना भारत आणि इंग्लंड सामन्याची उत्सुकता लागली असतानाच आता, इंग्लंडचा ऑल राउंडर मोईन अलीने विराटला आव्हान दिले आहे. या आव्हानाला विराट आता कसे प्रतीउत्तर देतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यावेळी भारतीय संघ दबावाखाली असेल. “विराट भारतासाठी अधिकाधीक धावा काढण्याच्या हेतूने मैदानावर उतरेल यात काही शंका नाही. मी देखील त्याची विकेट घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मोईन अलीने विराटला आव्हान करत म्हटले आहे. विराटने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेसमोर इंग्लड पराभूत झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झालीय. तसेच उपांत्य फेरीतलं स्थान पक्क करण्यासाठी इंग्लंडला भारत, न्यूझीलंड या तगड्या संघासमोर विजय मिळवण आवश्यक आहे. भारत आणि इंग्लंडमधील सामना उद्या रविवारी रंगणार आहे. या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.