भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या खेळीवर गेल्या कित्येक दिवसांपासून टीका सुरु होती. मात्र वेस्ट इंडिज विरुद्धच्या त्याच्या खेळीने आता सर्व त्याच कौतुक करू लागले आहेत. नुकतीच कर्णधार विराट कोहली नंतर जसप्रीत बुमराहनेही महेंद्रसिंह धोनीची प्रशंसा केलीय.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने ५६ धावांची खेळी केली होती. ही खेळी विजयात निर्णायक ठरली. त्याच्या या खेळीवर विराटने महेंद्रसिंह धोनीचे कौतुक केले होते. त्यांनतर आता जसप्रीत बुमराहनेही महेंद्रसिंह धोनीवर स्तुतीसुमने उधळली आहे.
जसप्रीत बुमराह म्हणाला कि, “धोनीच्या खेळीवर अवाजवी टीका होत आहे. कित्येकदा तुम्हाला असं वाटतं की धोनी संथ खेळत आहे, पण सामन्यात कधीकधी वेळ घेऊन मैदानावर टिकून राहणंही गरजेचं असतं. विंडीज आणि अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यातही त्याने हेच केलं, असे ते म्हणाला.