रत्नागिरीमधील आंबेनळी घाटात ८०० फुट खोल दरीत ट्रक कोसळून अपघात झाल्याची घटना घडली.या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि ट्रेकर्स पोहोचले असून ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने आंबेनळी घाटात आज सुमारे ८०० फुट खोल दरीत ट्रक कोसळला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. ट्रक चालक आणि क्लिनरला नियंत्रण सुटल्याचा अंदाज येताच दोघांनी बाहेर उडी मारली. यामुळे दोघे जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच घटनास्थळी पोलीस आणि ट्रेकर्स पोहोचले असून ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.