फगली, एमएस धोनी सारख्या चित्रपटातून व सर्वात जास्त पहिली गेलेली वेब सीरिज लस्ट स्टोरीजमधून प्रेक्षकांसमोर आलेली अभिनेत्री कियारा अडवानी सध्या तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या कबीर सिंह चित्रपटाचा सक्सेस एन्जॉय करतेय. या दरम्यान एका मुलाखतीत तिला सेम जेंडर रिलेशनशिपमध्ये आल्यास कुठल्या अभिनेत्री राहायला आवडेल असेल तिला विचारण्यात आले होते. यावर तिने दीपिका पादुकोनचे नाव उच्चारले.

कियारा आडवाणी, दीपिका पादुकोण
कियाराचा कबीर सिंह हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. दरम्यान कियारा एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी कियाराने एक मुलाखत दिली होती.या मुलाखतीमध्ये तिने तिच्या आयुष्याशी आणि करिअरशीसंबंधित अनेक गोष्टींवर चर्चा केली.या मुलाखती दरम्यान तिला तिच्या रिलेशनशिप बाबत काही प्रश्न विचारण्यात आले. ती म्हणाली जर तिला सेम जेंडर रिलेशनशिप राहण्यास सांगितले तर दीपिका पादुकोण सोबत राहायला आवडेल.त्यामुळे तिचे उत्तर एकूण दीपिका नक्कीच शॉक झाली असेल.
कियारा आडवाणीने फगली चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता. त्यानंतर एमएस धोनी आणि वेब सीरिज लस्ट स्टोरीज मध्ये तीने उत्तम काम केलय.