विश्वचषक स्पर्धेला अवघे तीन आठवडे उरले असताना आता सामन्यात रंजक मोड येऊ लागला आहे. स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या अवस्थेत असलेल्या संघांनी अनपेक्षित विजय नोंदवत स्पर्धेत चुरस निर्माण केली आहे.त्यामुळे अंतिम चारमध्ये समाविष्ट होणाऱ्या संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. असे असले तरी एक मात्र नक्की आहे, उपांत्य फेरीत न्यूझीलंड आणि भारताचे स्थान निश्चित मानले जात आहे.
नुकतेच श्रीलंकाने यजमान इंग्लंड विरुद्ध धक्कादायक विजय नोंदवला. त्यानंतर अफगाणिस्तान विरुद्ध भारत आणि वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड सामना रंजक ठरला. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेतील चुरस अधिक वाढली आहे. तसेच कालचा पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामनाहि रंजक ठरला. कारण पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला 49 धावांनी हार मानण्यास भाग पाडले. या पराभवामुळे अफगाणिस्तान आणि आफ्रिका हे दोन संघ आता उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता उर्वरित सहा संघांमध्ये अव्वल चार जागांसाठी चुरस रंगणार आहे.
अशा असतील संभाव्य लढती
- दक्षिण आफ्रिकेसाठी यंदाचा विश्वचषक अतिशय वाईट अनुभव ठरतोय. कारण त्यांनी 7 सामन्यांत केवळ एकच विजय मिळवला, तर पाच सामन्यांत पराभवाची झाला आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात केवळ 3 गुण जमा आहेत. पुढील दोन सामन्यांत त्यांना श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांचा सामना करावा लागणार आहे. हे दोन्ही सामने जिंकले तरी आणि हरले तरी त्यांना बाहेरचा रस्ता पकडावा लागणार आहे.
- अफगाणिस्तानने भारताला कडक टक्कर दिली होती. परंतु त्यांना सहा सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही. आता निव्वळ त्यांचे तीन सामने उरले आहेत. त्यातील आजचा सामना बांगलादेशशी असणार आहे.या सामन्यांत विजय मिळवूनही त्यांचे अंतिम स्तःन निश्चित नसेल.
- वेस्ट इंडिजचे सहा सामन्यात एकाच विजयाची नोंद केलीय. त्यांचा 4 सामन्यात पराभव झालाय व 1 सामना अनिर्णीत राहिल्याने त्यांच्या खात्यात तीनच गुण आहेत. पुढील तीन सामने त्यांना भारत, श्रीलंका आणि अफगाणिस्तान विरुद्ध खेळावे लागणार आहे.मात्र वेस्ट इंडिजचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना पाहता. इंडिज भारताला चांगली टक्कर देऊ शकते. त्यामुळे भारताने वेस्ट इंडिजला कमी लेखण्याची चुकी केल्यास पराभव निश्चित असेल.
- पाकिस्तानने कालच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून उपांत्य फेरीच्या शर्यतीत घौडदौड कायम राखली आहे. सहा सामन्यानंतर त्यांची गुणसंख्या 5 आहे. पुढील तीन सामन्यांत त्यांना न्यूझीलंड, बांगलादेश व अफगाणिस्तानचा मुकाबला असून हे तीन्ह्ही सामने जिंकल्यास 11 गुणांसह ते उपांत्य फेरीत प्रवेश मिळवू शकतात.
- बांगलादेश गुणतालिकेत सहाव्या स्थानावर असली तरी ती कोणत्याही क्षणी सामने पालटून उपात्य फेरी गाठू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सद्यस्थितीत सहा सामन्यानंतर त्यांच्या खात्यात 5 गुण आहेत. पुढील सामन्यांत त्यांना अफगाणिस्तान, भारत व पाकिस्तान यांचा मुकाबला करायचा आहे.
- विश्वचषकात सर्वात जास्त पावसाचा फटका श्रीलंकाला बसला आहे. चार सामन्यांत त्यांनी प्रत्येकी 2 विजय व हार स्वीकारले आहे. त्यामुळे सहा गुणांसह ते पाचव्या स्थानावर आहेत. मात्र श्रीलंकेने इंग्लंड विरुद्ध केलेली कामगिरी इतर सामन्यात केल्यास उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे. पुढील सामने त्यांना दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि भारत विरुद्ध खेळायचे आहेत.
- ऑस्ट्रेलिया संघही विश्वचषकात फॉर्मात आहे. 10 गुणांसह उपांत्य फेरीतील स्थान पक्के मानले जात आहे. त्यातच इंग्लंड चौथ्या स्थानावर आहेत आणि दोन पराभवांमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यात पुढील तीन सामन्यांत त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड या तगड्या प्रतिस्पर्धींचे आव्हान आहे. त्यामुळे या तगड्या संघाविरोधात सामना जिंकल्यास उपात्य फेरीचे तिकीट मिळू शकते.