बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात कोण बाहेर पडणार याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. यावेळी घरातून विद्याधर उर्फ बाप्पा जोशी बाहेर पडणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे.
बिग बॉसच्या घरात या आठवड्यात वीणा जगताप, शिव ठाकरे, पराग कान्हेरे, सुरेखा पुणेकर, बाप्पा जोशी, हे सदस्य नॉमिनेट झाले होते. त्यापैकी वीणा सुरक्षित असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. आजच्या एपिसोडमध्ये शिव, पराग सुरक्षित होणार आहेत. सुरेखा आणि बाप्पा दोघे डेंजर झोनमध्ये येणार असून बाप्पा घरातून बाहेर पडणार आहे.
#RT If you will miss him in Bigg Boss House.#BiggBossMarathi2 #BBMarathi2 pic.twitter.com/JLPebxsPXK
— Bigg Boss Marathi 2 (@BigBossMarathi) June 23, 2019
सोशल मीडियावर आजच्या एलिमेशनची जोरदार चर्चा रंगली असून बिग बॉसचे सगळे फॅन्स वेगवेगळ्या नावांचे अंदाज वर्तवत आहे. त्यात बाप्पाचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे आजच्या भागात कोण घराबाहेर जाणार हे पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे.