भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. भारताच्या संघात एक बदल करण्यात आला आहे.
पहिली बॅटिंग करताना भारताने एक गडी सुद्धा गमावला आहे. १० षटकात भारताने ४१ धावा बनवल्या होत्या. रोहित (१ धाव) बाद झाला आहे. मुजीब उर रहमान ने रोहितला बाद करून अफगाणिस्तानला चांगली सुरुवात करून दिली आहे.
भुवनेश्वर कुमार ऐवजी मोहम्मद शमी ला संधी देण्यात आली आहे. अपेक्षा केली जात होती कि रिषभला हि संधी दिली जाईल पण त्याला वाट पाहावी लागणार आहे. भारतीय संघासाठी सलामीला पुन्हा रोहित- राहुल जोडी आहे. या दोघांनी पाकिस्तानविरुद्ध शतकीय भागीदारी केली होती.
भारत – केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), विजय शंकर, एमएस धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, केदार जाधव, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.
अफगाणिस्तान – हजरतुल्लाह झझाई, गुलबदीन नाईब (कर्णधार), रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी, असगर अफगान, मोहम्मद नबी, इक्रम अली खिल (यष्टीरक्षक), नजीबुल्लाह झद्रान, रशीद खान, अफताब आलम, मुजीब उर रहमान