वसईच्या धाणीव बाग परिसरातील नाल्यात एका अन्यात महिलेचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे वसईमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा संशय उपस्थित करत संबंधीत घटनेची नोंद करून घेतली आहे.
दरम्यान ही घटना धाणीव बाग परिसरातील मारुती सुझुकी शो रूम जवळ घडली आहे. काल एका वाटसरूला नाल्या बाजूनी जाताना हा मृतदेह दिसला होता. हा मृतदेह पिशवीत भरुन ठेवलेला होता. त्या वाटसरूला हे कळताच एका जवाबदार नागरिकाच हक्क बाजावत त्याने तात्काळ वालीव पोलिसांना या घटने संबंधीत माहीती दिली आणि ही माहीती मिळताच वालीव पोलीसांनी घटनेस्थळी धाब घेतली. तसेच पोलिसांना तो मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनास पाठविला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करून महिलेचा एकंदरीत मृत्यू कसा झाला याचा शोध सुरू आहे.
दरम्यान पोलिसांना या प्रकरणी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. तर अद्याप त्या मृत महिलेची ओळख पटली नसून, तिचा मृत्यू कश्यामुळे झाले आहे याचे ही निधान लागलेले नाही. या प्रकरणी वालीव पोलीस त्या महिलीची ओळख आणि खुनाचा तपास करत आहेत.