प्रचंड खवळलेला पाऊसही थांबवू शकला नाही आपल्या भेटीला
ओसंडून वाहणारे रस्ते हि साक्षीला होते .
प्रेमाच्या ह्या महासागरात विलीन होण्यासाठी
तुझी ओढ मला तुझ्याकडे खेचत आणत होती .
कितीही अडचणी होत्या तुला कारणे सांगून घराबाहेर येत होतीस तू
किती ग ओढ तुझीही आपल्या प्रियकरासाठी
मीही चिंब झालो त्या पावसासोबत तुझ्या प्रेमात
बघत होतो तुझ्या डोळ्यात तर
जाणवले तू तर आधीच पोहून निघालिस या प्रेमाच्या महासागरात.
पाऊस कोसळत होता आपण थोडे खाल्ले हि
जोपर्यंत तुझ्या आवडीचे चॉकलेट दिलं नाही तोपर्यंत माझं मन तळमळत होतं.
पण एक सांगू का तुझ्या प्रेमाच्या छायेत पाऊसही काही करू शकला नाही .
आठवत राहील ते चुंबन जे एक वेगळंच सामर्थ्य देऊन गेलं.
तुझ्या माझ्या प्रेमाची ओढ काहीच न बोलताही खूप काही सांगून गेली .
खूप काही सांगून गेली.

दादाराव अरुणाबाई पंजाबराव नांगरे