मराठी बिग बॉसचे दुसरे पर्व चांगलेच गाजतेय. मात्र रोज रोजच्या वादावादीमुळे आता हे प्रकरण राज्याचे ‘बिग बॉस’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यत पोहोचलेय. भाजपाच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही तक्रार केली आहे.
बिचुकलेंचे वक्तव्य हे घटस्फोटित महिला, परित्यक्ता आणि सिंगल मदर महिलांचा अपमान करणारे असल्याचे वक्तव्य भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी केले आहे. या प्रकरणी रितू तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून संबंधित वाहिनी आणि अभिजीत बिचुकलेंवर कारवाई न झाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा रितू तावडे यांनी दिला आहे.
काय होता वाद
दोन दिवसांपूर्वी प्रसारीत झालेल्या कार्यक्रमामध्ये अभिजीत बिचुकले आणि रुपाली भोसले या स्पर्धकांमध्ये जोरदार वादावादी झाली. रुपाली भोसले यांनी बिचुकलेंवर आरोप करताना त्यांना मुलीची शपथ घेण्याचे आव्हान दिले. आरोप आणि मुलीची शपथ घेण्यासाठी सांगितल्यामुळे त्यांना राग आला आणि त्यांनी रुपालीला अपशब्द वापरले.