शिवानी सुर्वेने बिग बॉसला आरोग्याची कारणे देत घर सोडल होत. मात्र पुन्हा तिची घरात एंट्री करू शकते. एका इंटरव्यू वेळी शिवानी म्हणाली कि मला जर पुन्हा संधी मिळाली तर मी नक्की बिग बॉसच्या घरात जाईन पण माझी तब्येत पूर्णपणे बरी झाल्यावरच मी हा निर्णय घेईन.त्यामुळे तिच्या पुन्हा घरवापसीवर चर्चा होत आहे.
शिवानी सुर्वे बिग बॉसच्या घरातील तिच्या स्टाइल स्टेटमेंटमुळे तर कधी वादामुळे नेहमीच चर्चेत राहिली होती. दरम्यान शिवानीने घरातून बाहेर पडण्यासाठी चांगलाच तमाशा केला होता. जर बिग बॉसनं माझं ऐकलं नाही, तर मी कायदेशीर कारवाई करेन अशी थेट धमकीही तिनं बिग बॉसला दिली होती. त्यानंतर बिग बॉसने तिला समज देत घरातून बाहेर जाण्याची परवानगी दिली.
मराठी बिग बॉसमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारे कुठल्या स्पर्धकाला पहिल्यांदाच घरातून बाहेर काढण्यात आलं. शिवानीच्या जागी आता हिना पांचाळ हिची घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती.