विश्वकप 2019 या स्पर्धेतील सर्वात रोमांचक सामना म्हणजे 16 जून ला खेळला गेलेला भारत आणि पाकिस्तान सामना. या सामन्यात भारतीय टीमने पाकिस्तानी खेळाडूंना मैदानात लोळवले. त्यानंतर धावांचे मोठे आवाहन ठेऊन भारताने या सामन्यात विजय मिळवला. या भारताच्या विजयानंतर सोशल मीडियावर मीन्स, व्हिडिओ, फोटो व्हायरल झाले. त्यामधील एक व्हि़डिओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ घातला आहे.
हा व्हिडिओमध्ये एक भारतीय चाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मास्क घालून मग्नमस्त होऊन डान्स करत आहे. हा चाहता हातात भारतीय झेंडा घेऊन पाकिस्तानी Nach Punjaban या गाण्यावर डान्स करत आहे. तसेच या डान्सला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
या व्हिडिओमध्ये त्या चाहत्यांला सोशल मीडियावर प्रचंड लाईक्स आणि कमेंटद्वारे आपला आवड व्यक्त केला आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कोणत्या सामन्यातील आहे हे स्पष्ट झालेले नाही आहे. पण 16 जूनला पारपडलेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्यातील हा व्हिडिओ असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.