विश्व चषक अंतिम टप्प्यात असतानाचा टीम इंडियाला सर्वात मोठा झटका लागलाय. टीमचा स्टार ओपनिंग बॅट्समन शिखर धवन वर्ल्ड कप टीम बाहेर झाला आहे. ९ जूनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या सामन्यात शिखर धवनने शतक झळकावले होते.
शिखर धवनला नॅथन कुल्टर नाइलचा बॉल त्याच्या अंगठ्याला लागला होता. टीम मॅनेजमेंटला अपेक्षा होती की तो 15 दिवसांत फिट होईल परंतु असे होऊ शकले नाही.यांनतर युवा विकेटकीपर बॅट्समन रिषभ पंतला बॅकअप म्हणून इंग्लंडला बोलवण्यात आले होते.सध्या रिषभ पंत टीम सोबत ट्रेनिंग करत असून त्याने विश्व चषकातील एकही सामना खेळला नाही आहे.
दरम्यान आता कर्णधार विराट कोहली रिषभ पंतला प्लेइंग इलेवनमध्ये समाविष्ट करतो, का तीच विनिग टीम विश्वचशकात खेळवतो हे पाहणे हे महत्वाचे ठरणार. तसेच पाकिस्तान विरुद्धची भारताची सलामीची जोडी रोहित शर्मा व के एल राहुलला पाहता त्या दोघांनाच पुढील सामन्यात उतरवण्याची शक्यता आहे. त्यातच आता ऋषभ पंतला टीम इंडियामध्ये समाविष्ट केल्यास कोणत्या खेळाडूला डच्चू मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भारत सध्या विश्वचषकात चांगल्या फॉर्ममध्ये असुन वर्ल्ड कपचा प्रमुख दावेदार मानला जातोय. तसेच भारताने विश्वचषकात तीन सामने जिंकले आहेत, तर एक सामना रद्द करण्यात झाला.भारताचा पुढचा सामना २२ तारखेला अफगाणिस्तान विरुद्ध रंगणार आहे.