लातूर जिल्ह्यात एका फाऊंडेशनने 2.5 लाख स्क्वेअर फीट शेतात छत्रपती शिवाजी महाराजांचे ग्रास पेटिंग काढून त्यांना मानाचा मुजरा दिलाय. देशातील हे पहिले वहिले ग्रास पेंटिंग ठरले असून सध्या या भव्य पेटिंगची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहे.
अक्का फाऊंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील निलंगा येथील एका 2.5 लाख स्क्वेअर फीट शेतात शिवाजी महाराजांची ही भव्य पेंटिंग साकारली गेली आहे. सर्वप्रथम 6 एकर परिसरात गवत उगवण्यास सुरुवात केली. जेव्हा हे गावात हिरवे झाले तेव्हा ही पेंटिंग साकारली गेली. मंगेश निपाणीकर हा या पेंटिंगचा निर्मितीकार आहे.
Video : लातूर येथे तयार झाले देशातील पहिले Grass Painting; 7 दिवस गवत उगवून साकारले शिवाजी महाराज pic.twitter.com/Q1Z3jQYMU3
— Batamidar (@batamidar) June 19, 2019
कलाकार मंगेश निपाणीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पेंटिंगकरीता गवत उगवण्यासाठी जवळजवळ दीड हजार किलो बियाणे वापरला गेले. आकृतिचा आकार निश्चित करण्यासाठी एक आठवडाभर आधी बियाणांचे रोपण केले गेले होते. या पेंटिंगमध्ये थ्री डी इफेक्ट आणण्यासाठी त्यात ग्राफिंगही केले गेले आहे.