बिग बॉस मराठीमध्ये वाद विवाद, मस्ती, प्रेमप्रकरण पाहायला मिळते. बिग बॉस मराठी सीझन 2 यात अगदी पहिल्या दिवसापासून वादामुळे चर्चेत असलेली शिवानी सुर्वेने जो काही गोंधळ घातला, त्यावर शिवानी सुर्वेला महेश मांजरेकरांनी कडक शब्दांत समज दिली. शिवानी सुर्वेने मला घराबाहेर जायचं आहे असे बिग बॉसला अनेकवेळा सांगितले. अखेर शिवानी घराबाहेर गेली. यानंतर पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली हिना पांचाळची. हिना पांचाळ कोण आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वांमध्ये उत्सुकता होती. तर पाहूया हिना कोण आहे?
हिना उत्कृष्ट नृत्यांगना, अभिनेत्री व मॉडेल आहे. चित्रपटसृष्टीतील हिना आयटम गर्ल गाण्यांसाठी प्रसिद्ध असून तिचे बालम बॉम्बे आणि बेवडा-बेवडा झालो मी टाइट लोकप्रिय आयटम नंबर आहेत.
हिनाला साऊथ इंडियन फिल्मसची मलायका अरोरा म्हणून सुध्दा ओळखले जाते. तिने 2014 मध्ये आपल्या करियरला सुरुवात केली. तमिळ, तेलगू चित्रपटासह बॉलीवूड चित्रपटातही तिन काम केलय. हम हैं तीन खुराफाती’, ‘लाइफ में ट्विस्ट है’, ‘जस्ट गम्मत’, ‘मिस टनकपुर हाजिर हों’, ‘लोड्डे’, ‘रत्न मंजरी’, ‘यगावरयिनुम ना काक्का’, ‘बाबूजी एक टिकट बम्बई’ या चित्रपटात काम केले आहे.
2015 मध्ये फोर्ब्स इंडियाच्या 100 सेलिब्रिटीजच्या यादीत हिना पांचाल यांचाही समावेश होता. तसेच हीना फिटनेसबद्दल प्रचंड सजग आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर वर्कआउट करतानाचे व्हिडिओ ती सातत्यानं अपलोड करत असते. इंस्टाग्राम पर हिनाचा जबरदस्त चाहतावर्ग आहे.