भारताने आपल्या वर्ल्ड कप अभियानाची उत्कृष्ट सुरुवात केली. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि आता पाकिस्तानला भारताने पराभूत केले. पावसामुळे न्यूजीलंड विरुध्द सामना रद्द झाला होता. अशाप्रकारे भारताने विजयाची हॅट्रिक केली.
भारताच्या यशात बॅट्समन जितके महत्तवाचे तितकेच बॉर्लसही आहेत. यात भारताला आणखीन एक झटका लागला आहे. शिखर धवन नंतर आता भुवनेश्वर कुमारला दुखापत झाली आहे. भुवनेश्वर कुमारला काल पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बॉलिंग दरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. यामुळे सामन्यात त्याने बॉलिंग केली नाही. त्याच्या जागेवर विजय शंकरला बॉलिंग देण्यात आली. विजयने पहिल्यातच बॉलवर कमाल करत इमाम उल हकला आऊट केले.
भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थित विजय शंकर आणि बाकीच्या बॉलर्सनी खूप चांगली बॉलिंग करत भारताला ८९ धावांनी विजय मिळवून दिला. दरम्यान, विराट सामना संपल्यानंतर म्हणाला, ‘भूवीची दुखापत छोटी आहे, तो घसरल्याने ही दुखापत झाली. सध्यातरी ती खूप गंभीर वाटत नाही. भूवी दोन ते तीन सामने बाहेर राहू शकतो पण पुनरागमन करेल’.