भारताने पाकिस्तान विरुद्धच्या सामना ८९ रन्सने जिंकला.त्यामुळे भारताने आता ४ सामन्यात तीन विजय मिळवले आहेत.
भारताने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर ३३७ धावांचे टार्गेट ठेवेल आहे. भारताकडून रोहित शर्माने १४०, के एल राहुल ५७, हार्दिक पंड्या २६, विराट कोहली ७७ व धोनी १ रन बनवुन आउट झाला होता.
पाकिस्तानने चांगली सुरुवात केली होती मात्र भारतीय बॉलर्सने ती जास्त वेळ टिकून दिली नाही.१५० धावांच्या आतच पाकिस्तानच्या ५ विकेट गेलेल्या, दरम्यान पाऊस पडल्याने खेळ थांबवण्यात आला होता.
यावेळी डीएलएस मेथड नुसार पाकिस्तान ३०२ धावांचे लक्ष देण्यात आले होते.मात्र हे लक्ष पूर्ण करण्यास पाकिस्तान अपयशी ठरले. भारताने ८९ धावांनी सामना खिशात घातला.