विश्वकप स्पर्धा २०१९ चा सर्वात रोमांचिक सामना काल रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान असा रंगला होता. भारताने पाकिस्तानच्या खेळाडूना अगदी मैदानात लोळवले. रोहीत शर्माने १४० तर के राहूलने ५७ आणि विराट कोहलीच्या ७७ धावा काढून भारताने पाकिस्तान खेळाडूंवर सुरूवाती पासूनच दबाव निर्माण केला. तर भारताने पाकिस्तानला तब्बल ८९ धावांनी पराभूत केले. या सामन्याच्या विजयानंतर भारतामध्ये रात्रभर दिवाळी साजरी होत होती. तसेच सर्वत्र सोशल मीडियावर फक्त टीम इंडिया झळकत होती. भारताच्या विजयानंतर सोशल मीडियावर एकच फोटो फिरत आहे आणि तो फोटो म्हणजे करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमुरचा. तैमुरने भारताने मिळवलेल्या विजयाचा आनंद अनोख्या पद्धतीत साजरा केला.
तैमूरच्या या फोटोमध्ये त्यांनी भारतीय टीमची जर्सी घातली आहे. तैमूरने पाकिस्तानावर मिळालेल्या विजयावर भारतीय टीमला सलाम केला आहे. सध्या तैमूर लंडनमध्ये करिना आणि सैफसोबत सुट्टीचा आनंद घेत आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील सामना हा फक्त भारतीय टीमसाठी महत्वाचा नसतो, तर संपूर्ण भारतासाठी महत्वाचा असतो. भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. तसेच हा सामना युद्धापेक्षा कमी नाही आहे. तेसच काल मिळालेला विजयाला धरून एकूण ७ वेळा भारताने पाकिस्तानावर विजय मिळवला आहे. तसेच यापूढे ही हे सत्र चालूच राहणार इतक मात्र नक्की.