अक्षय कुमार आणि कैटरीना कैफ ही जोडी अनेक दिवसांनी पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या सिनेमामध्ये अक्षय आणि कैटरिना झळकणार आहे. लवकरच हैदराबादमध्ये या सिनेमाचं शेड्युल सुरू होणार असून ‘टिप टिप बरसा पानी…’ या प्रसिद्ध गाण्यावर अक्षय – कैटरिना झळकणार आहे. रोहित शेट्टीने या गाण्याचे मालकी हक्क विकत घेतले असल्याचं सांगण्यात आले आहेत.
‘पिपिंग मून’ ने दिलेल्या माहितीनुसार, रामोजी फिल्म सिटीमध्ये अक्षय आणि कैटरिना या गाण्याचं शूटिंग करणार आहेत. टिप टिप बरसा… हे मूळ गाणं अक्षय कुमार आणि रविना टंडन यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. ‘मोहरा’ सिनेमातील अल्का याग्निक आणि उअदित नारायण यांनी गायलेलं हे गाणं आजही लोकप्रिय आहे.