नुकतेच महाराष्ट्रामध्ये मान्सूनने हजेरी लावली आहे. अद्याप पावसाला सुरूवातही झाली नाही आणि संपूर्ण महाराष्ट्र समुद्रात निर्माण झालेल्या वायू चक्रिवादळाने त्रस्त झाले आहेत. तसेच आता हा वायू चक्रवादळ तीव्र गतीने गुजरातच्या दिशेने कुच करत होता. मात्र, वादळाणे आपली दिशा बदलली असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. तसेच हा चक्रिवादळ १३५ ते १४५ किमीच्या वेगाने पोरबंदर, वेरावळ आणि द्वारका किनारपट्टीच्या जवळून जाणार आहे. त्यामुळे गुजरातच्या किनारपट्टीला त्याचा परिणाम जाणावणार आहे. तसेच मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्याता वर्तविण्यात आली आहे.
गुजरातला बसणाऱ्या चक्रिवादळाच्या सुरक्षेसाठी सरकारने पाऊले उचलली आहेत. सरकारनी सुमारे ३ लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हालविण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय संकट निवारण दलाच्या (एनडीआरएफ) ५२ तुकड्याही तैनात ही करण्यात आल्या आहेत. तर पश्चिम रेल्वेने गुजरातला जाणाऱ्या ५० रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.