इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकावर पावसाचे सावट असून महाराष्ट्रातही दुष्काळा सारखी परिस्थीती आहे. अशा या दोन्ही परिस्थितीवर मराठमोळा क्रिकेटपटू केदारने आपल्यापरीने तोडगा काढलाय. केदारने इंग्लंडमधल्या पावसाला महाराष्ट्रात जाण्याचे साकड घातले आहे.दरम्यान या संदर्भातला व्हिडीओ व्हायरल झालाय. त्याच्या या अशा प्रकारच्या मैदानावरील आव्हानात्मक खेळीने क्रिकेट चाहत्यांकडून त्याचे कौतुक केले जातेय.
जा रे जा रे पावसा.. तुझी महाराष्ट्रात जास्त गरज आहे इथे नाही' – केदार जाधव ची IND vs NZ सामन्यापूर्वी वरूणराजाला साद pic.twitter.com/Bd2vjnRvoU
— Batamidar (@batamidar) June 13, 2019
इंग्लंडमधल्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचा भारत विरुद्ध न्यूझीलंड खेळ पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केदार जाधवने इंग्लंडमधील पावसाकडे गाऱ्हाणं गायलं आहे. त्यानं नॉटिंगहॅम येथे नाही, तर महाराष्ट्रात तुझी गरज असल्याची विनंती पावसाला केली आहे.
‘जा रे जा रे पावसा, माझ्या महाराष्ट्रात जा, तुला माझ्या महाराष्ट्रात जायची गरज आहे, तिकडे जास्ती गरज आहे पावसाची, इकडे नाही’ अशी दहा सेकंदांची क्लीप मराठमोळ्या केदारने इंग्लंडमधील नॉटिंगहॅममधल्या स्टेडियमवरुन पोस्ट केली आहे.केदारच्या अशा आव्हानात्मक खेळीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याचावर आता कौतुकांचा वर्षाव सुरु आहे. त्याचबरोबर केदारची आर्त हाक वरुणराजापर्यंत पोहचेल अशी अपेक्षा क्रिकेट चाहते करत आहेत. दरम्यान विश्वचषकातील पहिले दोन्ही सामने भारताने खिशात घातले आहेत.आज भारताचा तिसरा सामना न्यूझीलंड विरुद्ध असणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे.