टीम इंडियात आता हल्क म्हणजे रिषभ पंतने एंट्री केलीय. शिखर धवनच्या जागी टीम इंडियाचा युवा खेळाडू रिषभ पंतला संधी मिळाली आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. टीम इंडियामध्ये सामील झाल्यानंतर ऋषभ पंतने सराव सुरू केला आहे.
रिषभ पंत बुधवारी नॉटिंघमला पोहोचेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १३ जूनला सामना होईल. रिपोर्टनुसार भारतीय टीम मॅनेजमेंट शिखर धवनच्या इंजरी संदर्भातील रिपोर्ट ICC टेक्निकल टीमला सोपवणार असून यानंतर रिप्लेसमेंटसाठी विनंती केली जाईल.
टीम मॅनेजमेंट धवनच्या खेळण्याबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत रिषभ पंतला अंतिम-१५ मध्ये स्थान देता येणार नाही. याआधी जेव्हा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम निवडण्यात आली तेव्हा रिषभ पंतलाकडे निवड समितीने दुर्लक्ष केले आणि दिनेश कार्तिकला टीममध्ये समाविष्ट करण्यात आले होते.