Ads
बातम्या

कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक लागू

डेस्क desk team

कोकण रेल्वेने पावसाळी वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार आता सुरक्षिततेचा उपाय म्हणून आज १० जूनपासून कोकण रेल्वेची गती धीमी करण्यात येणार आहे. सदरचे वेळापत्रक ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहे. विशेष म्हणजे मुंबईहून कोकणात येणाऱ्या गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही. मात्र, वेग मंदावल्याने गाड्या कोकणात उशिराने पोहचणार आहेत.

वेगावर मर्यादा असणार

पावसाळी वेळापत्रकानुसार कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाडय़ांच्या वेगावर मर्यादा घालण्यात येणार आहेत. रोहापासून ठोकूरपर्यंत ताशी ७५ च्या वेगाने रेल्वेगाडय़ा धावणार आहेत. वीर ते कणकवली ताशी ७५, कणकवली ते मडगाव ताशी ९०, मडगाव ते कुमठा ताशी ७५, कुमठय़ापासून उडपीपर्यंत ताशी ९० वेग राहणार आहे. तसेच मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्यास गाडय़ांचा वेग ताशी ४० राहणार असल्याने प्रवाशांचा प्रवास आणखी लांबणीवर पडणार आहे.

अतिवृष्टीसाठी ६३० रेल्वे कर्मचारी तैनात

अतिवृष्टीदरम्यान निर्माण होणाऱ्या अडथळय़ांवर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नियोजनावर भर देत ठोस उपाययोजनांचा अवलंब करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार अतिवृष्टीदरम्यान गस्तीसाठी ६३० रेल्वे कर्मचाऱ्यांची जादा कुमकही तैनात करण्यात येणार आहे. पावसाळा संपेपर्यंत २४ तास नियंत्रण कक्षही उभारण्यात येणार असून २४ तास गस्त सुरू राहणार आहे.

रेल्वेचे नवीन वेळापत्रक

जनशताब्दी एक्स्प्रेस (१२०५२) कुडाळ दुपारी १.४८, कणकवली २.२२ वाजता.
कोकणकन्या (१०११२) सावंतवाडी सायं. ६.११, कुडाळ ६.३७, कणकवली ७.१३
दीवा पॅसेंजर (५०१०५) सावंतवाडी सकाळी ८.३०, कुडाळ ८.५२, कणकवली ९.१९.
मंगला एक्स्प्रेस (१२६१७) कणकवली सकाळी ३.३२ वाजता.
मंगलोर एक्स्प्रेस (१२१३४) कणकवली रात्री ११.५६ वाजता.
मांडवी (१०१०४) सावंतवाडी सकाळी १०.१०, कुडाळ सकाळी १०.२८ , कणकवली ११ वाजता.
तुतारी (११००४) सावंतवाडी सायंकाळी ५.३०, कुडाळ सायंकाळी ५.४८, कणकवली सायंकाळी ६.२६ वाजता.

मत्स्यगंधा (१२६२०) कुडाळ रात्री ८.५२ वाजता. नेत्रावती (१६३४६) कुडाळ सकाळी ७.५४. डबलडेकर (११०८६) (मंगळ, गुरू) सावंतवाडी सकाळी ६.५४, कणकवली सकाळी ७.४४ वाजता.
डबलडेकर (१११००) (रविवारी) सावंतवाडी दुपारी १.०२, कणकवली दुपारी २ वाजता.
तिरुनवेली दादर (२२६३०) गुरुवारी कणकवली सकाळी ६.४० वाजता.
ओखा (१६३३६) (गुरु, शनी) कणकवली दुपारी १२.०८ वाजता.

करमळी – एलटीटी (२२११६) (गुरु), कुडाळ दुपारी २.१२, कणकवली दुपारी २.४२ वाजता.
एर्नाकुलम पुणे (२२१४९) (मंगळ, शुक्र) सावंतवाडी रात्री ८.२०, कणकवली रात्री ९.५ वाजता.
तेजस (२२१२०) (बुध,शुक्र,रवी) कुडाळ दुपारी १२.५४.
गरीबरथ एलटीटी (१२२०२) (शुक्र,सोम), सावंतवाडी पहाटे ३.४० वाजता.
कोचुवेली एलटीटी (२२११४) (मंगळ, शुक्र), कुडाळ रात्री ९.२८ वाजता.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: