बिग बॉस मराठी 2 च्या घरात आज पाहिलं नॉमिनेशन पार पडलं. आज मैथिली जावकर घरातून बाहेर पडली आहे. सुरुवातीपासूनच मैथिली जावकर (Maithili Jawkar) घरात फारशी ऍक्टिव्ह दिसली नाही. घरातून बाहेर पडण्यापूर्वी तिने घरात एकही खेळ खेळता आला नाही ही खंत बोलून दाखवली. घराबाहेर पडल्यावर तिने नेहा शिवाय सारे मित्र असल्याचं बोलून दाखवलं. अभिजित बिचुकले आणि माधव बिचुकलेच्या रूपाने भाऊ मिळाल्याचं सांगितलं.
आजही बिग बॉसच्या घरात होस्ट महेश मांजरेकरांनी स्पर्धकांची शाळा घेतली. यामध्ये वीणा आणि विद्याधर जोशींचं भांडण, किशोरी आणि नेहाचं भांडण यावरून त्यांना बाजू मांडायला वेळ दिला होता. घरात वीणा, किशोरी शहाणे, रुपाली आणि पराग चा एक गट आणि बाकी दुसरा गट असं असल्याचं चित्र स्पष्ट आहे. ते स्वीकारा आणि खेळ पुढे खेळा असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान सुरेखा पुणेकर यांना त्यांच्या फॅनने चुगली बूथ मध्ये वीणा आणि किशोरी त्यांना घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत हे सांगितल्या नंतर ‘मला कमी समजू नका’ असं ठणकून सांगितलं आहे.
महेश मांजरेकरांनी आजही वीणा आणि शिवानी सुर्वे यांच्या वादामधून तापलेल्या घरात एक खास खेळ घेत घरातल्या सदस्यांचा त्यांच्या वागणुकीवर कौल घेतला आहे. तर अभिजीत बिचुकले आणि सुरेखा पुणेकरांच्या इंग्रजी संवादाने घरातील वातावरण थोडं हलकं करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Hi tһere, І eһjoy reading through your article.
Ι wanted to write a little comment to support yoᥙ.