Ads
मनोरंजन

प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते गिरीश कर्नाड पडद्याआड

डेस्क desk team

भारतीय नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते आणि तुघलक, हयवदन या नाटकांची नाव घेतल्यावर डोळ्यासमोर येणारे गिरीश कर्नाड यांचे आज निधन झाले आहे. प्रदर्घ आजारांनी ते खूप काळ आजारी होते. अखेर आज वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली आहे. बंगळुरूतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गिरीश यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

 

गिरीश कर्नाड यांचा जन्म १९ मे १९३८ रोजी माथेरान येथे झाला होता. त्यांचे संपूर्ण कुटुंब कर्नाटकमध्ये स्थलांतरीत झाल्यावर त्यांनी कन्नड भाषेला आपलेसे केले. त्यांचे सर्व शालेय शिक्षण पुण्यात झाले. त्यांनी गणित आणि संख्याशास्त्र हे विषय घेऊन प्रथम श्रेणीत बी.ए. उत्तीर्ण झाले. त्यांचवेळी त्यांनी नाटकाचे धडे घेतले. त्यानंतर त्यांनी नाटक क्षेत्रात स्वत:ला झोकून दिले. त्यांनी नाव भारतात नाही तर परदेशातही गाजू लागले. गिरीश यांनी मराठी चित्रपट उंबरठा मध्येही महत्वाची भूमिका साकारली होती.

गिरीश कर्नाड यांनी वंशवृक्ष या चित्रपटातून चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण केले होते. त्यांचा एस. एल. भैरप्पा हा कन्नड चित्रपट कादंबरीवर आधारित होता, आणि त्याच चित्रपटाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. त्यानंतर त्यांने अनेक कन्नड आणि हिंदी चित्रपटामध्ये काम केली होती. तसेच गिरीश यांनी हिंदी, मराठी, मल्याळम, तेलुगू, तामीळ अशा ७० हून अधिक चित्रपटामध्ये त्यांनी कामे केली होती.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: