अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा छोटा भाऊ इकबाल कासकरला आज प्रकृती अस्वस्थतेमुळे ठाणे सिविल रुग्णालयात अँडमिट करण्यात आले आहे. मात्र कासकारला ठाणे सिविल रुग्णालयात दाखल करण्यावर वकील विशाल इंगवलेने आक्षेप घेतलाय.<div>
हफ्ते वसुलीच्या तीन गुन्ह्यामुळे ठाण्याच्या जेलध्ये जेरबंद असलेला इकबाल कासकरला गंभीर आजार झालाय. त्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून विविध आजारापासून ग्रस्त आहेत. त्यामुळे त्याच्या वकिलांनी कासकरला आता सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे अशी मागणी याचिकेद्वारे ठाणे न्यायालयात केली होती.यावर कोर्टाने कासकरला जेजे आणि सेंट जान रुग्णालयात उपचार करण्याची मुभा दिली.
मात्र आज सकाळी अचानक कासकरला छातीमध्ये दुखू लागले. यावेळी ठाणे जेल प्रशासनाने त्यांना सरकारी रूग्णालयात न नेता ठाणे सिविल रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या या भूमिकेवर वकील विशाल इंगवलेने आक्षेप नोंदवलाय. तसेच ठाणे जेल प्रशासन षड्यंत्र रचत असल्याचे ते म्हणाले.