पालघर जिल्ह्यातील वाघाडी येथील सूर्या नदी पात्रात काल बुडालेल्या तरुणीचा मृतदेह आज अखेर सापडला. 19 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आज सकाळी तिचा मृतदेह सापडला. उजा गवई असे त्या तरुणीचे नाव होते. याप्रकरणी कासा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आलीय.<div>
उजा गवई ही बुलढाणा येथून कासा येथे आपल्या नातेवाईकांकडे पाहुनी आली होती. दरम्यान संध्याकाळी 5.15 वाजेच्या सुमारास वाघाडी येथील भीमबांध येथे उजा गवई तिच्या दोन मैत्रिणीसह अंघोळीसाठी पाण्यात उतरल्या होत्या. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने उजा गवई ही बुडाली तर तिला वाचविण्यासाठी गेलेल्या दोन मुलींना वाचविण्यात स्थानिकांना यश आले.
तसेच उजा गवई बुडाली असता तिचा मृतदेह बेपत्ता झाला होता. यांनतर स्थानिक व अग्निशामक दलाच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली. मात्र शुक्रवारी तिचा मृतदेह मिळालाच नाही. त्यांनतर आज सकाळी अग्निशमन दलाला तब्बल 19 तासांनी तीचा मृतदेह हाती लागला.