दहावी बोर्डाचा आज निकाल जाहीर झाला असून निकालाची प्रतिक्षा संपली आहे. यंदा कोकण विभागाने 88.38 टक्क्यांनी बाजी मारली तर नागपूरचा सर्वात कमी निकाल लागला आहे. यंदा दहावीच्या परिक्षेसाठी एकूण 16 लाख विद्यार्थी परिक्षेला बसले होते. ज्यापैकी १२ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
हेही वाचा– दहावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी
मार्च २०१९ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार ८६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ज्यापैकी १६ लाख १८ हजार ६०२ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यामध्ये विद्यार्थिनींची संख्या ७ लाख ४८ हजार ७१५ आणि विद्यार्थ्यांची संख्या ८ लाख ७० हजार ८८७ होती. या सगळ्यांपैकी एकूण १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
हेही वाचा– SSC Result 2019 : असा पाहा दहावीचा निकाल
राज्याचा दहावीचा निकाल ७७.१० टक्के लागला. निकाल तब्बल १२ टक्क्यांनी कमालीचा घसरला आहे. यंदाचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल झाल्यानंतची ही पहिलीच परीक्षा होती. त्यामुळे विद्यार्थांच्या गुणामध्ये घट झाली असल्याचे माहिती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली.