Ads
बातमीदार स्पेशल

आज जागतिक महासागर दिन

world oceans day
जागतिक महासागर दिन
डेस्क desk team

आज 8 जून आणि हा दिवस जागतिक महासागर दिन (World Oceans Day ) म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण जगभरात हा दिवस पाणला जातो. संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस  पासून अधिकृतरीत्या पाळण्यास सुरूवात केली. समुद्र दुषित होण्याचे प्रमाण वाढल्याने त्यासंबंधी जनजागृती करणे आवश्यक बनले आहे. या संदर्भातला प्रस्ताव १९९२ मध्येच कॅनडाने ब्राझीलमध्ये झालेल्या वसुंधरा शिकार परिषदेत मांडला. त्याला संयुक्त राष्ट्रसंघाने २००८ मध्ये मान्यता दिली. तेव्हापासून ‘द ओशन प्रोजेक्ट’ या अमेरिकन संस्थेच्या सहकार्याने,  जागतिक महासागर दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होत आहे आहे.

दिन साजरा करण्याचा मुळ हेतू

जगभरातील महासागरांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वर्षातून एकदा साजरा केला जातो. महासागर हे संरक्षिले जावेत आणि नैसर्गिकदृष्ट्या असलेले त्यांचे महत्व जपले जावे असा हा दिवस साजरा करण्याता मुख्य हेतू आहे. प्राणवायू,  वातावरणाचे नियमन, अन्नाचा पुरवठा,  औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांचे स्थान महत्वाचे आहे. या निमित्ताने व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर महासागर रक्षणाची संधी घेतली जाते. दरवर्षी एखादा ध्येय ठेऊन हा दिवस साजरा केला जातो. २०१८  मध्ये प्लॅस्टिकपासून महागराचे रक्षण हे ध्येय ठेवण्यात आले होते.

आवाहन

महासागर हे आपल्याला लाभलेली नैसर्गिक संपत्ती आहे. त्याचे संरक्षण केले नाही तर महासागरातील जलचरांना धोका निर्माण होऊ शकतो, आणि त्याचे विपरित परिणामाला आपल्यालाही समोरे जावे लागेल त्यामुळे आज जागतिक महासागर दिना निमित्त महासागरचे संरक्षणाचे कार्य हाती घ्या.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

1 Comment

 • I’ve been exploring fоr a little bit for any һigh quality articles
  or weblog posts in this kind of area . Exploring in Yaho᧐
  I eventually stumbled upon this site. Reading this info So i’m
  satisfied to showw that I’ve ann incredibly excellent uncanny feeling I found out exactly what
  I needed. I such a lot unquestіonably wⅼl
  make surе to do not fail to remember this webЬ site annd
  provides it a glance on a relentless basis.

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: